Frequently asked question

पालीच्या वेळेस पोटात दुखल्यामुळे वंधत्व येते ?

पाळीतील पोटदुखी हे दाखवते कि तुमच्या शरीरात प्रत्येक महिन्यात अंडे तयार असून ते वेळेवर फुटते . याचा अर्थ पाळीत पोट दुखणे हे नॉर्मल आहे, परंतु जर हि पोटदुखी प्रत्येक महिन्यात वाढत असेल व जर संबंधाच्या वेळेसही पोट दुखत असेल तर एंनडोमेट्रीओसिस असण्याची शक्यता आहे. तरी तुमच्या स्त्रीरोग तज्ञाकडून तपासणी करून घेणे.

पती व पत्नीच्या रक्तगटातील विषमतेमुळे वंध्यत्वाचा प्रोब्लेम निर्माण होतो ?

रक्तगट वेगळे असणे व वंध्यत्वाचा अर्थाअर्थी संबंध नाही .

संबंधानंतर संपूर्ण वीर्य बाहेर निघते, त्यामुळे मला गर्भ राहत नाही ?

संबंधानंतर वीर्य बाहेर येणे हि नॉर्मल प्रक्रिया आहे. खूप जोडप्यांचा गैरसमज असतो कि त्यांच्या वंध्यत्वाचे हे कारण आहे., पण जर तुमचा संबंध व्यवस्थित आला असेल तर शुक्रजंतू काही शेकांदाच्या आत गर्भाशयाच्या मुखाजवळ पोहोचलेले असतात. व नंतर जे काही पाणी बाहेर येते, त्यात रिकामे शुक्रजंतू व सेमायनल फ्लूड बाहेर येते . म्हणूनच हे पाणी वंध्यत्वाचे कारण नसते .

फक्त प्रथांना करणे व देवावर विश्वास ठेवण्याने गर्भधारणा होते ?

नाही. देवावर विश्वास ठेवल्याने तुमच मनोबल वाढते., पण फक्त प्रार्थतेने किंवा अंधविश्वास ठेऊन आपण शाररीक कमतरतेवर मात करू शकत नाही. जसे कि शुक्रजंतू अजिबात नसणे किंवा स्रीयांच्या दोन्हीहि गर्भनलिका बंद असणे वगैरे.

धातूच्या रंगावरून, दिसण्यावरून व प्रमाणावरून आपण पुरुषाच्या गर्भधारणेच्या निदान करू शकतो ?

नाही. कारण धातू हा सेमायनल फ्लूड, प्रोस्टॅटिक फ्लूड व शुक्रजंतू मिळून बनलेला असतो. प्रत्येक घटक वेगवेगळ्या भागातून बाहेर पडतात. त्यामुळे धातूचा रंग, व त्याचे प्रमाण गर्भधारणेची क्षमता ठरवत नाही. कारण हे ठरलेले असते. शुक्रजंतूची संख्या व त्याची शक्ती आणि शुक्रजंतूचे मोजमाप व क्षमता हि फक्त सुक्ष्मदर्शकानेच शक्य होते .

वंध्यत्व अनुवांशिक आहे?

जर तुमच्या आईला, आजीला गर्भाधारणे साठी त्रास झाला असेल तर गरजेचे नाही कि तुम्हालाही तो सुधा त्रास होईल., पण जर का तुमचे लग्न नात्यातील असेल तर या गोष्टीची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अशा जोडप्याची संपूर्ण तपासणी होणे गरजेचे आहे.

गर्भधारणेसाठी दररोज संबंध येणे जरूर आहे ?

नाही. कारण शुक्रजंतू गर्भपिशावितील द्रव्यामध्ये ४८ ते ७२ तासापर्यंत जिवंत राहू शकतात. परंतु स्रीबीज फुटण्याच्या कालावधीमध्ये साधारणता: १ दिवसा आड संबंद येऊ द्यावा .

पुरुषाच्या शुक्रजंतूची संख्या दरवेळेस एकसारखी असते ?

नाही. शुक्रजंतूची संख्या, त्यांची शक्ती वेळोवेळी फरक असू शकतो . उदाहरणार्थ मानसिक तान, औषिधी किंवा आजारामुळे शुक्रजंतूच्या संख्येत,तसेच शक्तीमध्ये बदल घडू शकतो

मानसिक ताणतणावामुळे वंध्यत्व येते का ?

होय! खूप प्रयत्नानंतरही गर्भ धारणेसाठी समस्या उद्दभवु शकतात. त्याचे एक महत्वाचे कारण मानसिक ताणतणाव आहे. त्यामुळे फक्त वंध्यत्वाची तपासणी व उपचार घेऊन उपयोग होत नाही . जसे ज्यांचे दैनंदिवस जीवन खूपच ताणतणावाचे असते.त्यांच्यात वंध्यत्वाचा धोका जास्त असतो. तसेच उपचाराला प्रतिसाद कमी प्रमाणात मिळतो. त्याचे कारण संप्रेरकातील बदल ( Hormonal Imbalance ) होय.

मानसिक ताणामुळे स्रीबीज निर्मितीच्या प्रकियेत दोष निर्माण होतो का ?

ज्या महिला घराबाहेरच काम करतात त्यांना, तणाव जास्त असतो . त्यामुळे कधी कधी स्रीबीज तयार होत नाहीत किंवा स्रीबीज वाढीची व फुटण्याची क्षमता कमी प्रमाणात असते त्यामुळे. त्यांच्यात गर्भधारणा होऊ शकत नाही .

डॉक्टरांनी सांगितलं आहे, माझे स्रीबीज वेळेवर तयार होत नाहीत याचा नेमका अर्थ काय ?

ह्याचा अर्थ तुम्हाला PCOS नावाचा आजार असू शकतो. ह्यामध्ये शरीरातील संप्रेरकमध्ये बदल होता व अंडाशयावरती सूज येते .

टेस्ट टयूब बेबी हा प्रर्याय सर्वात शेवटी, उशिरा घ्यावयाचा निर्णय आहे ?

नाही. टेस्ट ट्यूब बेबी हा प्रर्याय खूप उशिरा निवडल्यास त्याचा यशस्वी होण्याचा दर कमी असतो

टेस्ट टयूब बेबी करताना दरवेळेस दुसऱ्याचा धातू ( शुक्रजंतू ) किंवा स्रीबीज वापरले जाते ?

नाही. प्रत्येक वेळी असेच असतेच असे नाही. काही कारणास्तव असे करण्याची गरज भासल्यास पती – पत्नीला यांची संपूर्ण कल्पना देऊन रितसर त्यांची लिखित परवानगी घेऊनच असे केले जाते.

टेस्ट टयूब बेबी केल्यानंतर गर्भपात होतो ?

असे जरूर नाही. नॉर्मल प्रमाणात गर्भपाताचा जेवढा धोका आहे. तेवढा धोका यातही आहे

टेस्ट टयूब बेबी केली तर जुळे मुले होतात ?

प्रत्येक वेळेस असे गरजेचे नाही. कधी – कधी जुळे किंवा तीलेही राहू शकतात किंवा फक्त एकाच गर्भ राहतो.

टेस्ट टयूब बेबीने जन्माला आलेली मुले सर्वसाधारण मुलासारखी असतात ?

होय. टेस्ट टयूब बेबीद्वारे जन्माला आलेली मुले हि आज बऱ्याच चांगल्या पदावर कार्यरत आहे. टेस्ट टयूब बेबीमध्ये जी क्रिया साधारणत: शरीरात घडते. परंतु काही कार्नास्तव घडू शकत नाही, हि प्रक्रिया फक्त प्रयोगशाळेत केली जाते.

“सरोगसी ” हा देखील टेस्ट टयूब बेबीचा प्रकार आहे काय ?

होय .

“सरोगसी ” मंजे नेमके काय ?

एखाद्या महिलेने दुसऱ्या एखाद्या जोडप्याच्या बाळाल जन्म देणे म्हणजेच “सरोगसी “, साध्या भाषेत एखाद्या स्रीचे गर्भाशय उधार घेणे होय .

“सरोगसी ” कोणामध्ये करावी ?

अ ) स्रीच्या शरीरात गर्भपिशवि नसणे ( उदाहरणार्थ काही कारणांमुळे गर्भपिशवी काढून टाकल्यास किंवा जन्मतः गर्भपिशवि नसल्यास )
ब) अविकसित गर्भ पिशवी
क) गर्भापिशावितील आतील भाग ( अस्तर किंवा गादी ) खराब असल्यास
ख) एखादी स्री काही आजारांमुळे गर्भधारणेसाठी सक्षम नसल्यास
ग) वारंवार होणारा गर्भपात
घ) वारंवार टेस्ट टयूब बेबीची प्रक्रिया करूनही गर्भधारणा न झाल्यास

टेस्ट टयूब बेबी केली म्हणजे १००% गर्भधारणा होते ?

नाही, जगात टेस्ट टयूब बेबिंचा यशस्वी होण्याचा दर ५०% आहे आणि यशस्वी होण्याचा दर बऱ्याच गोष्टीवर ठरलेला आहे, जसे कि, वंध्यत्वाचे कारण स्रीचे वय , शुक्रजंतूची प्रत, भ्रूण तयार करण्यासाठी वापरलेली औषधी,
भ्रूण सोडल्यानंतर वापरात येणारी औषधी व जेथे भ्रूण तयार करण्यात येतो त्या लँँबची रचना व क्वालिटी इत्यादी .

Services Provided

  • Intra Uterine Insemination (IUI)
  • Laparohysteroscopy (HLS)
  • In Vitro Fertilization (IVF)
  • Intra-Cytoplasmic Sperm Injection
  • Test Tube Baby
  • Infertility Treatment
  • Oocyte, Embryo Donation
  • Uro Gynaecology
  • Contraceptive & Obesity Care
  • WELL Woman & Menopause Clinic

Our Timing

Mon-Fri11AM-5PM & 7:30PM-8:30PM
SAt11AM-5PM
SunCLOSED

You cannot copy content of this page

Call Now
Directions
×