सोमवारचा दिवस , दुपारचे साधारणतः ११.३० ते १२ वाजले असतील , ओ पी डी मध्ये भरपुर गर्दी . अचानक एक आठ वर्षाची गोंडस मुलगी बेदरकारपने माझ्या केबिन चे दार उघडून आत शिरली .
” मला ओळखलंत का काकु?” तिचा सरळ सरळ प्रश्न . थोडा राग , थोडे आश्चर्य आणि थोडा गोंधळ ह्याचा संमिश्र असा भाव माझ्या चेहेऱ्यावर उतरला . चित्रपटात दाखवतात तसे काही क्षणा नंतर हळुच केबिन चे दार उघडले आणि एक लाल केसरी लुगडं घातलेली महिला तिच्या मागोमाग आत आली. क्षणार्धात माझ्या डोक्यात भूतकाळाच वादळ उठलं . आरे ही तर आपली आशाबाई लेवाडे . मी ज्या वेळी वंध्यत्व आणि टेस्ट ट्यूब बेबी ह्याची ट्रीटमेंट करायला सुरुवात केली होती , त्या वेळेची ती माझी सुरुवातीच्या काही रुग्णांन पैकी एक . तिची मुलगी आज आठ वर्षाची झाली होती .
मी केबिन मधील पेशंट ला थोडा वेळ बाहेर थांबायची विनंती केली आणि त्या चुणुकदार मुली कडे फक्त बघत राहिले . म्हणतातना माया येण्यासाठी नात्याची गरज नसते , हवे असते ते समोरच्याचे आपलेसे करुन घेणारे व्यक्तिमत्व. तिला मी मांडीवर उचलुन घेतले . ” शेजारणीला घेऊन आलेय , लेकरुबाळ न्हाई तिला . धा वरीस झालं लग्नाला “‘ आशाबाई बोलली . नंतर त्या गोंडस मुलीसोबत मी बोलायला सुरुवात केली . काही मिनिटात तिने मला वन. टू. फोर. पासुन ते ऐ. बी. सी. डी. पर्यंत आणि जॉनी जॉनी एस पप्पा पासुन तर ये रे ये रे पावसा पर्यंत सगळं शिस्तीत बोलुन दाखवलं . आशाबाई अभिमानाने तिच्या कडे बघत होत्या आणि तिला एक एक गोष्ट करुन दाखवायला सांगत होत्या आणि तीही आनंदाने मनापासुन सगळं करुन दाखवत होती .” मह्या ५ पिढ्यात कोणी इतकं हुशार न्हाईबा , तितकी ही पोर हुशार हाय . लई कलाकारी करतीया गावभर नाव झालंय माय ह्या पोरटीमुळ मह आन तुमचं ” आशाबाई च्या चेहेऱ्यावर प्रचंड समाधान होत आणि तिच्या समाधानी चेहेऱ्याकडे बघुन मला आभाळ ठेंगणं झालं म्हणजे काय , ह्याची उपरती आली .
ही पोस्ट लिहिण्याचे करणं म्हणजे बऱ्याच जोडप्यांना आय. व्ही. एफ. करतांना प्रश्न पडलेला असतो कि ह्या उपचार पद्धतीने जन्माला आलेली बाळे , बाकी मुलांसारखी सामान्य ( NORMAL ) असतात का ?
त्यांना बहुतेक ह्याचे उत्तर इथे नक्की मिळेल .
—- डॉ . हर्षलता लड्डा
वंध्यत्व आणि टेस्ट ट्यूब बेबी तज्ञ
सकाळी सकाळीच मोबाईलची रिंग वाजली. ऑफिसला जायची आवराआवर आणि कामाच्या पसाऱ्यात मी तसाच फोन उचलला. आमच्या कॉलेजच्या एका जुन्या मित्राचा फोन होता. बाप झाल्याची बातमी देत त्याने आनंदाने आम्हाला बारश्याचे आमंत्रण दिले. बातमी ऐकून मी आणि प्रणव खूप खुश झालो. पण मनात कुठेतरी एक खंत होतीच. आपल्या आयुष्यात हा आनंद कधी येणार याची.
आमच्या लग्नाला ६ वर्षे होऊन गेली. अनेक दवाखाने, औषधोपचार केले, पण गुण मात्र आला नाही. बाळाची अपेक्षा आता सोडून द्यावी असं देखील वाटत होतं आणि आयुष्यात एक गोंडस बाळ आल्याशिवाय आनंदाने जगताही येणार नाही हे सुद्धा कळत होतं. पण कशाचंच उत्तर मात्र मिळत नव्हतं. मी तरी कधीतरी रडून ओरडून दुःख व्यक्त करायचे, पण प्रणव… त्याला तर माझ्यासारखं ढसाढसा रडताही येत नव्हतं.आई-वडील आणि सासू सासऱ्यांचं प्रेशर वेगळंच.
-प्रणव आणि सुप्रिया, पुणे.
You cannot copy content of this page