वारंवार आय व्हि एफ़ करुनदेखील अपयश का येते? Recurrent IVF Failure in Marathi

Dr. Harshlata Ladda

Consultant Infertility specialist

Samarth IVF Center

Aurangabad

वारंवार आय. व्ही. एफ. करुनही   आपयश का येते ?

Recurrent IVF Failure

कुठलेही निःसंतान जोडपे ज्या वेळी टेस्ट ट्यूब बेबी किंवा आय. व्ही. एफ. चा निर्णय घेते, त्यावेळी त्यांच्या अपेक्षा खुप उंचावलेल्या असतात कारण जगात स्वतःचे मुलबाळ असण्या एवढे सुख कशातच नाही. परंतु ज्यावेळी आय. व्ही. एफ. चा पहिला प्रयत्न अयशस्वी होते ,त्यावेळी मात्र त्यांची मानसिक अवस्था फारच उदासीन होते . त्यांच्या मध्ये नैराश्य यायला सुरुवात होते . त्यांना सतत एकच प्रश्न भेडसावत असतो तो म्हणजे माझ्या सोबतच असे का घडले ?

आणि जेव्हा वारंवार आयव्हीएफ चे प्रयत्न अयशस्वी होऊ लागतात त्यावेळी मात्र त्यांच्या चिंतेत अधिकच भर पडते आणि त्यांना वाटू लागते कि आम्हाला आमचे स्वतःचे बाळ नक्की मिळेल का ?

आम्हीच असे कमनशिबी का आहोत ?

आज आपण ह्या लेखामधून अतिशय सध्या सरळ भाषेत समजावून घेऊ ” वारंवार आय. व्ही.एफ. मध्ये येणारे अपयश म्हणजे काय ?

ह्याविषयी बऱ्याच तज्ञ लोकांचे वेगवेगळे मत ,मतांतरे आहेत  तरीही “तीन उत्कृष्ट प्रतीचे भ्रूण (ताजे अथवा गोठवलेले ) , वापरून तीन  वेळा ,अश्याप्रकारे आय. व्ही. एफ. करून देखील यश आले नसल्यास त्याला आय व्ही एफ मधील  वारंवार येणारे अपयश असे संबोधले जाते”

करणे काय  आसु शकतात ?

खालील पातळीवर दोष आसू शकतात,

 • 1)स्त्रीबीज.
 • 2)पुरुषबीज.
 • 3)भ्रूण.
 • 4)गर्भपिशवी.
 • 5)पत्नि व पतीचे आरोग्य.
 • 6)आय व्ही एफ करतानाचे तंत्र.
 •  7)वरील सर्व कारणांचे मिश्रण. 
 • 8)अस्प्ष्ट कारण.

 

स्त्रीबीज——

Recurrent IVF Failure Problem at Oocyte Level

जसे कि आपण पाहतो , आय व्ही एफ चा यशस्वी होण्याचा दर  हा महिलेच्या वयाशी निगडित आहे .

महिलेचे वय जितके अधिक, तितके आय व्ही एफ मध्ये यश येण्याचे प्रमाण कमी .असे घडते कारण  महिलेचे वय वाढल्यास तिच्या अंडाशयातिला  अंड्यांमध्ये अस्वाभाविक गुणसूत्रांचे प्रमाण वाढते आणि अस्वाभाविक अंड्यांपासून सदोष भ्रूण निर्मिती होते . नैसर्गिकरित्या गर्भपिशवी सदोष भ्रूण  शरीरात वाढू देत नाही.हि जरी नैसर्गिक प्रक्रिया असली तरी निःसंतान जोडप्यांसाठी हा फार मोठा आघात असतो .

तसेच वाढत्या वयानुसार अंडाशयातील अंड्यांची संख्या देखील कमी कमी होत जाते . त्यामुळे आय व्ही एफ करतांना कमी अंडे तयार होतात आणि त्यांची प्रत देखील चांगली नसते . त्यामुळे चांगल्या प्रतीचे भ्रूण मिळणे कठीण होऊन जाते आणि वारंवार आय व्ही एफ चे प्रयत्न अयशस्वी होऊ लागतात .

जर पुर्वी महिलेला एन्डोमेट्रिओसिस सारखा आजार झाला असेल किंवा अंडाशयाचे काही ऑपेरेशन झाले असेल तरीही वारंवार आय व्ही एफ चे प्रयत अयशस्वी होऊ शकतात .

महिलेला पी . सी . ओ .एस . ( स्त्री बीज तयार न होणे किंवा ना फुटणे ) सारखा आजार असेल तरी स्त्रीबीज ची प्रत खराब आसू शकते .

 

आपण काय उपाय योजना करु शकतो ?

 

प्रत्येक वेळी ह्यावर उपाययोजना करता येईल हे शक्य नसते ,कधी कधी उपाय करणे अशक्य असते

आय व्ही एफ चा निर्णय लवकर घ्यावा , खूप उशिरा निर्णय घेतल्यास ह्या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागू शकते .

आय व्ही एफ करतांना ज्यास्तीत ज्यास्त इंजेकशन वापरावे , त्यांचे प्रमाण वाढवावे .

नवीन आलेल्या  इंजेकशन चा वापर करून बघावा जसे कि ग्रोथ हॉर्मोन , अँड्रोजेन सारखी औषधी वापरावी .

PGD  किंवा शेवटी डोनर स्त्री बीज वापरावे .

शुक्रजंतु किंवा पुरुषबीज —-

Recurrent IVF Failure Problem at Sperm Level

गर्भधारणेच्यावेळी शुक्रजंतु हा स्त्रीबीजात प्रवेश करतो आणि गर्भधारणा होते . शुक्रजंतु पुरुषांमधील गुणसूत्र स्त्रीबीजात स्वतः सोबत घेऊन जातो हे सगळे गुणसूत्र स्त्रीबीजातील गुणसूत्रा सोबत जोडी तयार करतात , व एक सशक्त भ्रूण तयार होते .

जर शुक्रजंतु ची प्रत चांगली नसेल किंवा त्यामध्ये जो DNA आहे त्याचे तुकडे झालेले असतील (  fragmented  DNA ) तर चांगल्या प्रतीचे भ्रूण तयार होणार नाहीत आणि वारंवार आय व्ही एफ चे प्रयत्न अयशस्वी होऊ शकतात . वीर्यात जंतुसंसर्ग असेल तरीही तयार होणाऱ्या भ्रूणामध्ये जंतुसंसर्ग होऊन वारंवार आय व्ही एफ फेल होऊ शकते .

असे का घडते ?

सध्याची जीवनशैली , जसे कि स्थूलता , दारु पिणे,सिगारेट , विडी पिणे , तंबाखु किंवा गुटका खाणे , काही औषधी , खूप उष्ण जागेत काम करणे , खूप घट्ट अंतर्वस्त्र वापराने , मोबाईल संगणक चा आती प्रमाणात वापर .

जननइंद्रियाला होणारे संसर्गजन्य आजार जसेकी क्षयरोग , गालफुगी वगैरे

जननइंद्रियाला लागलेला मार . जननइंद्रियावरील जन्मजात असणारी सुज म्हणजेज हैड्रोसिल  किंवा व्हेरिकोसिल सारखा आजार .

शुक्रजंतूचा जीवनकाल हा ७२ घंट्यांचा असल्यामुळे काही दिवसापूर्वी झालेल्या आजारा  मुळे किंवा ताणतणावामुळे देखील कधी कधी अल्पकालीन शुक्रजंतूमध्ये दोष येऊ शकतो .

काय ऊपाय करता येऊ शकतो ?

प्रत्येक वेळी ह्यावर उपाययोजना करता येईल हे शक्य नसते ,कधी कधी उपाय करणे अशक्य असते

 • अँटिऑक्सिडेन्ट सारखी औषधी वापरणे
 • वारंवार वीर्यसख्खलन करणे
 • दारु ,गुटखा तंबाखु सिगारेट बंद करणे
 • सैल आंतर्वस्त्रं वापराने
 • कमी उष्ण जागेवर काम करणे
 • हैड्रोसिल , व्हेरिकोसील वर  शस्त्रक्रिया करणे
 • जननइंद्रियाची स्वच्छता ठेवणे
 • ICSI किंवा दात्याचे शुक्रजंतु वापराने
 • कधी कधी सरळ अंडाशयातून शुक्रजंतु काढून त्यापासून इक्सी ( TESA -ICSI )करणे  .

भ्रूण —-

RECURRENT IVF FAILURE PROBLEM AT EMBRYO LEVEL

जसे कि आपण आधी चर्चा केली कि गार्भपिशवी फक्त सशक्त भ्रूण रुजवते आणि अस्वाभाविक भ्रूण रुजवत नाही , हि जरी एक नैसर्गिक प्रक्रिया असेल तरीही आय व्ही एफ करणाऱ्या जोडप्यांना तो  एक मोठा धक्का असतो . महिलेचे वय जसे जसे वाढत जाते , तसे तसे अस्वाभाविक भ्रूण तयार होण्याचे प्रमाण वाढते .

आपण आधी चर्चा केली कि पुरुषबीज आणि स्त्रीबीज ह्यांच्या मध्ये असणारे गुणसूत्र एक मेका सोबत जोडी करतात आणि सशक्त भ्रूण तयार होतो .जोडी करताना गुणसूत्र कमी अथवा अधिक असतील तर योग्य जोडी तयार होणार नाही आणि पर्यायी सशक्त भ्रूण तयार होणार नाही .असे स्त्री च्या वाढत्या वयामुळे होऊ शकते .

वारंवार होणाऱ्या आय व्ही एफ अपयशाला हे कारण सर्वाधिक जबाबदार आहे असे म्हणता येईल .

भ्रूणाचे आवरण जर जाड आणि टणक झाले असेल तरी देखील वारंवार आय व्ही एफ चे प्रयत्न अयशस्वी होऊ शकतात .

 

काय करता येऊ शकते ?

आय व्ही एफ चे प्रयत्न वाढवणे

आय व्ही एफ करताना ब्लास्टोसिस्ट  कल्चर हा पर्याय निवडणे .

लेझर असिस्टेड ह्याटचिंग

पी जि डी  सारखी पद्धत ,वगैरे वगैरे

 

गर्भपिशवी —

Recurrent IVF Failure Problem at Uterus level

खालील बाबींमुळे वारंवार आय व्ही एफ चे प्रयत्न अपयशी होऊ शकतात .

गर्भपिशवीवर किंवा गर्भपिशवीच्या आत  असणाऱ्या गाठी ( FIBRIOD ). गर्भपिशवीला आत असलेला पडदा , गर्भपिशवी आतून चिकटलेली आसने , एन्डोमेट्रिओसिस सारखा आजार ,जन्मजात गर्भपिशवीत असणारे दोष जसे कि आर्धी गर्भपिशवी , अविकसित गर्भपिशवी , गर्भनळ्यात भरलेले पाणी (hydrosaphix ).

गर्भपिशवीला आतून झालेला   जंतुसंसर्ग ,( वारंवार आय यु आय केल्याने , जननइंद्रियाचा क्षयरोग इत्यादी )

गर्भपिशवीचे मुखद्वार खूप लहान असल्यास , किंवा खूप घट्ट असल्यास भ्रूण सोडताना येणारा व्यत्यय .

हार्मोन (संप्रेरक )मधील विसंगती .

रोगप्रतिकार प्रणाली मध्ये असलेले दोष .

ह्या समस्यांसाठी आपण काय करू शकतो ?

 • दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून वरील बऱ्याच समस्यांवर निदान  तसेच उपचार करता येऊ शकते .
 • संप्रेरकांमधील झालेला बदल योग्य रीतीने नियंत्रित करून आय व्ही एफ करणे .

महिला तसेच पुरुषाचे स्वास्थ —

ह्याचा देखील आय व्ही एफ च्या यशावर बराच परिणाम दिसून येतो . ह्या लेखामध्ये ह्याच्या विषयी बरीच उहापोह करण्यात आली आहे . सगळ्यात महत्वाचे , परंतु थोडे दुर्लक्षित म्हणजे जोडप्यांचे मानसिक आरोग्य . सतत दडपणाखाली आणि नैर्यशेने घेरल्यामुळे देखील वारंवार अपयश येऊ शकते . सकारात्मक दृष्टिकोन बऱ्याचदा यश येण्यास मदत करते.

आती लठ्ठपणा आणि स्थूलता ,ह्यामुळे सुद्धा आय व्ही एफ आयशस्वी होऊ शकते .

मद्यसेवन , विडी अथवा सिगारेट चे व्यसन , मधुमेह , रक्त घटकातील दोष , थायरॉईड चा आजार सुद्धा वारंवार आय व्ही एफ फेल होण्यास कारणीभूत असू शकतात .

उपाय योजना काय करता येऊ शकते?

सिगारेट , दारू पिणे बंद करणे, नियमित व्यायाम, योगा  करणे ,मधुमेह , थायरॉईड चा आजार नियंत्रित ठेवणे . इनॉक्सिपयरीन सारखी औषधी वापराने इत्यादी

आय .व्हि .एफ़ . करतानाचे तंत्र —

ह्याचातीलही बऱ्याच गोष्टींची दखल घेणे जरुरीचे आहे

जसे आय व्ही एफ़ करणाऱ्या डॉक्टरांचा अनुभव
एम्ब्रियोलॉजिस्ट चा अनुभव
वापरण्यात येणाऱ्या औषधी , आय व्ही एफ़ लॅबचा दर्जा ,वापरण्यात येणारे इतर साहित्य आणि त्यांचा दर्जा .

आपण काय उपाय करू शकतो ?

 • अनुभवी तज्ञ डॉक्टर निवडणे .
  उत्तम दर्जा असणाऱ्या सेंटर ची निवड करणे . इत्यादी

You cannot copy content of this page

Call Now
Directions
×