सरोगसी ( उधार गर्भाशय ) म्हणजे नेमके काय?

डॉ . हर्षलता लड्डा
वंध्यत्व निवारण तज्ञ & टेस्ट ट्यूब बेबी तज्ञ
औरंगाबाद.
7774047404
आज काल सरोगसी  या विषयावर बरीच चर्चा होत आहे , आपण ह्या लेखातून साध्या आणि सरळ भाषेत जाणून घेऊ  सरोगसी म्हणजेच उधार गर्भाशय किंवा भाडे तत्वावर घेतलेले गर्भाशय

म्हणजे नेमके काय व हे कश्या  पद्धतीने वापरावे आणि कोणा  मध्ये वापरावे  ?” एखाद्या स्त्री किंवा महिलेला , तिचा स्वतःचा गर्भ तिच्या गर्भ पिशवीत कुठल्याही कारणास्तव वाढवता येत नसल्यास , एखाद्या सक्षम परस्री च्या गर्भाशयात तिचा गर्भ वाढवणे म्हणजेच सरोगसी होय “ह्या बद्दल समाज मध्ये अजूनही बऱ्याच शंका कुशंका आहेत. समाज अजूनही ह्या नवीन तंत्रज्ञानाला स्वीकारायला लवकर पुढे येत नाही . शाहरुख खान , तुषार कपूर , कारण जोहर ह्यांच्या सारख्या सेलिब्रिटीज ने देखील ह्या तंद्रज्ञानाद्वारे आपत्त्यप्राप्ती करून घेतलेली आहेत .ह्याचे किती प्रकार आहेत ?

१) पारंपरिक सरोगेट  – ह्यामध्ये महिलेच्या म्हणजेच  सरोगेट आई च्या गर्भाशयात दात्याचे ( डोनर ) किंवा ज्या महिलेला बाळ हवे आहे तिच्या पतीचे शुक्रजंतू नेऊन सोडले जातात . ह्या मध्ये सरोगेट माता हीच त्या बाळाची जनुकीय माता (जैविक माता )असते .

२) गर्भधारक सरोगेट  -ह्या मध्ये सरोगेट मातेच्या गर्भाशयात आय व्ही एफ ह्या तंद्राज्ञानाद्वारे तयार केलेले बाळ सोडले जाते. ह्या मध्ये  सरोगेट माता ही त्या बाळाची जनुकीय माता (जैविक माता) नसते ..

सरोगसी हा पर्याय कोणी निवडावा ?

१) वारंवार आय व्ही एफ करून यश येत नसल्यास .
२) गर्भपिशवीचे आतील अस्तर खराब झाले असल्यास .
३) वारंवार गर्भपात होत असल्यास .
४) महिला गर्भधारणेस सक्षम नसल्यास .
५) जन्मजात गर्भ पिशवी नसल्यास .
६) गर्भधारणे नंतर महिलेच्या आरोग्यास मोठा धोका उध्दभवण्याची शक्यता असल्यास .
७) काही कारणास्तव गर्भ पिशवी काढून टाकलेली असल्यास.

सरोगेट माता कशी निवडावी ?

१) सरोगेट मातेचे वय कमीत कमी २१ वर्ष किंवा त्याहून अधिक असावे , शक्यतो ३० च्या आतील असावी .
२)  सरोगेट मातेने कमीतकमी एक सुदृढ बालकाला जन्म दिलेला असावा .
३) सरोगेट मातेला कुठलाही गंभीर आसावा ..
४) सरोगेट मातेचे संपूर्ण समुपदेशन झालेले असावे .
५)सरोगेट   माते सोबत संपूर्ण कायदेशीर करार झालेला असावा .

भारतात सरोगसी कायदेशीर आहे का?

भारतात सरोगसी कायदेशीर आहे .
सर्वोच्य न्यायालयाने ई . स . वि सन २००२ मध्ये ह्याला कायदेशीर मान्यता दिलेली आहे

You cannot copy content of this page

Call Now
Directions
×