आज आपण समजावून घेणार आहोत , कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतर जर काही कारणास्तव आपल्याला परत मुलबाळ हवे असल्यास काय काय पर्याय उपलब्ध आहेत आणि ते किती यशस्वी होतात आणि त्याचे फायदे आणि नुकसान. महत्वाचे म्हणजे नळ्यांची पुनर्बांधणी किंव्हा शाश्त्रक्रिया पलटी करणे असे ज्याला साधारण बोली भाषेत बोलले जाते .

Tubal Ligation - Family Planning

म्हणजे नेमके काय ?

कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया हि साधारणतः आपल्याला  पुढे  अपत्य नको असल्यास महिलांवर  केली जाते . त्यामधले नळ्या म्हणजेच इंग्रजीत त्याला आम्ही फेलोपियन ट्युब असे म्हणतो , त्या एक तर घट्ट बांधुन टाकल्या जातात किंव्हा तोडून टाकल्या जातात . त्या नळ्या पूर्ववत करणे म्हणजे  शास्त्रक्रिये द्वारे त्यांना परत जोडुन त्यांना उघडणे आणि गर्भधारणे साठी तयार करणे होय  .

ही शस्त्रक्रिया कशी केली जाते ?

दोन पद्धती आहेत , पोटाला चिरा देऊन किंव्हा दुर्बिणी द्वारे.

पोटाला चिरा देऊन केलेल्या शस्त्रकियेनंतर रुग्णालयात ज्यास्त दिवस ऍडमिट राहावे लागते . दुर्बिणी द्वारे केल्यास ती एक दिवसीय प्रक्रिया आहे .

दुर्बिणी द्वारे केल्यास यश येण्याची संभावना थोडी अधिक असते.

यशस्वी होण्याचा दर – साधारणतः ५०% पर्यंत असते .

यशस्वी होण्यास कोणते  घटक करणीभुत  असतात ?

  • आधी कोणत्या पद्धतीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली आहे , म्हणजे चिरा देऊन कि दुर्बिणी द्वारे ?
  • आधीची शस्त्रक्रिया करतांना नळ्या किती प्रमाणात कापल्या आहेत , त्यांची लांबी किती शिल्लक आहे .?
  • हि पालटवण्याची शस्त्रक्रिया करण्याच्या वेळी महिलेचे वय किती आहे ?
  • तिला असलेले बाकीचे आजार म्हणजे उच्चरक्तदाब , मधुमेह वगैरे .
  • हि शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर चा अनुभव आणि कौशल्य .  .
  • आणि हॉस्पिटल मधील उपलब्ध सुविधा . इत्यादी

जर ही शस्त्रक्रिया करुन देखील यश आले नाही तर आय व्हि एफ हा पर्याय आपण वापरू शकतो .

अधिक माहिती साठी संपर्क करा –8888629388,kinva 7774047404 kinva aamchya saket shalala bhet dya www.samarthivf.com