Dr.Harshlata Laddha

MBBS, DGO,FRM

Consultant Infertologist

Samarth Hospital

Aurangabad.

 

दुर्बिणी द्वारे तपासणी  म्हणजे नेमके काय?

“ह्या तपासणी मध्ये नाभी च्या जागेवरून एक छोटीशी दुर्बीण टाकून आणि गरज भासल्यास आजून  दोन ते तीन छोटी पोर्ट टाकून ओटीपोटाच्या आतील भाग तपासाला जाऊ शकतो उदाहरणार्थ गर्भपिशवी , गर्भनलिका , अंडाशय वगैरे.”

 

वंध्यत्वा मध्ये दुर्बिणीची तपासणी केंव्हा करावी ?

  1. पुरुषाच्या शुक्रजंतूची संख्या आणि शक्ती नॉर्मल असेल आणि तरीही गर्भधारणेस अडचण येत असल्यास .
  2. महिलेला पी सि ओ एस (PCOS ) चा त्रास असेल आणि औषधांनी फरक पडत नसल्यास( पाळी वेळेवर न येणे , उशिरायेणे, स्त्रीबीज तयार न होणे किंव्हा स्त्रीबीज फुटण्यास अडथळा आसने ) .
  3. एन्डोमेट्रिओसिस ( Endometriosis ) चा ज्यास्त त्रास असल्यास .
  4. ओटीपोटाचा जंतुसंसर्ग असल्याची शक्यता असल्यास .
  5. एच एस जी(HSG-Hysterolapingography ) वर नळ्या बंद किंवा नळ्यांला काही प्रॉब्लेम आढळ्यास .
  6. गर्भपिशवीत जन्मजात काही दोष असल्यास ( गर्भपिशवीला पडदा आसने , दोन गर्भपिशव्या असने वगैरे ).
  7. कुटुंब नियोजनाचे ऑपेरेशन झाले आणि परत संतती हवी असल्यास .
  8. गर्भपिशवीवर ,गर्भपिशवीच्याआत अंडाशयावर ,अंडाशयाच्या आत किंवा नळ्यांवर गाठ आसने

सगळ्यात महत्वाचा  मुद्दा जो कि आपल्याला समजावून घ्यायचा आहे तो म्हणजे प्राथमिक दृष्टा हि एक तपासणी आहे , ह्यामध्ये जर काही दोष  आढळून आल्यास , आणि तो त्या शास्त्रक्रिये दरम्यान नीट करता येण्या जोगा असेल व नीट केला तरच तो एक इलाज आहे असे आपण म्हणू शकू . वंधत्वात तील काही आजार फक्त दुर्बिणीद्वारे केलेल्या तपासणीतच कळू शकतात उदाहरणार्थ एन्डोमेट्रिओसिस . ह्या तपासणी मध्ये ओटीपोटातील संपूर्ण अवयव डॉक्टर  स्वतःच्या डोळ्याने बघतात , त्यामुळे बऱ्याच वेळा वंध्यत्वाचे नेमके कारण शोधून काढण्यास मदत होते .

ही किती मोठी तपासणी आहे ? मी माझे काम , परत कधी पर्यंत करू शकेल ?

साधारणतः हि एक ओ पी डी प्रोसिजर आहे , एक दिवसात सुट्टी मिळू शकते . काही वेळा, काही मोठा प्रॉब्लेम असल्यास ज्यास्त दिवस देखील अडमिट राहावे लागू शकते .

ज्यातिज्यास्त महिला तपासणी नंतर रात्री चालू फिरू लागतात . एक दोन दिवसाच्या आरामानंतर आपण आपले काम पूर्ववत करू शकता .

मला ऑपेरेशनची भीती वाटते , खूप त्रास होतो का ?

हि तपासणी संपूर्ण भुल देऊन केली जाते , त्यामुळे तपासणी करतांना कुठलीही वेदना जाणवत नाही .तपासणी झाल्यावर वेदनाशामक औषधी दिली जातात , त्यामुळे वेदनेचा फार काही विचार करण्याची गरज भासत नाही . तरीही प्रत्येकाची वेदना  सहन करण्याची वेगवेगळी शक्ती असते .

ह्या तपासणीचे काही  दुष्परिणाम (side effects ) आहेत का ?

तसे पाहायला गेले तर जगात बऱ्याच गोष्टींचे दुष्परिणाम असतात . तश्या ह्यामध्ये देखील आहे . परंतु आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे ह्या दुषपरिणांचे प्रमाण अत्यल्प आहे .

खालील दुष्परिणाम होऊ शकतात

  1. जखमेच्या आजूबाजूला खाज येणे .
  2. ओटीपोटात रक्त स्त्राव
  3. आतील अवयव एकमेकांना चिकटणे
  4. जंतुसंसर्ग

इत्यादी..