(IUI)
कृत्रिम बिजारोपण हे सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक प्रजनन उपचारांपैकी एक आहे. ह्यामध्ये गर्भाशयात जास्तीत जास्त सक्षम शुक्रजंतू नेऊन सोडले जातात ज्याने गर्भधारणेची संभाव्यता वाढते .

ह्याची प्रक्रिया काय आहे ?
ह्या प्रक्रियेमध्ये स्त्रीला स्त्रीबीज तयार करण्यासाठी काही विशिष्ट औषधी दिले जातात. अंडे फुटण्याच्या वेळी पुरुषाचे शुक्रजंतू साफ करुन त्यातील शुक्रजंतूंची शक्ती वाढवून ते गर्भपिशवीच्या वरच्या भागात एका छोट्याशा नळीद्वारे नेऊन सोडले जातात. आशा पद्धतीने शुक्रजंतूंना स्त्रीबीजाजवळ नेऊन सोडल्यामुळे शुक्रजंतू आणि स्त्रीबीज ह्यांचे मिलन होऊन फलन होण्याची शक्यता बळावते.

कृत्रिम बीजारोपण ( आय यू आय ) आणि टेस्ट ट्यूब बेबी यामधील फरक काय ?
टेस्ट ट्यूब बेबीमध्ये शुक्रजंतु आणि स्त्रीबीज ह्यांचे फलन शरीराबाहेर एका प्रयोगशाळेत केले जाते व गर्भ हा प्रयोगशाळेत तयार करून नंतर स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो. परंतु कृत्रिम बीजारोपणात शुक्रजंतु स्त्रीबीजाजवळ नेऊन सोडले जातात व शुक्रजंतु स्वतः नैसर्गिकरीत्या स्त्रीबिजात प्रवेश करतो आणि स्त्रीला गर्भधारणा होते. कृत्रिम बीजारोपण हे टेस्ट ट्यूब बेबीच्या तुलनेत कमी खर्चिक आहे.

– कृत्रिम बीजारोपण ही प्रक्रिया टेस्ट ट्यूब बेबीपेक्षा कमी त्रासदायक आहे.
– परंतु टेस्ट ट्यूब बेबीचा गर्भधारणेचा दर कृत्रिम बीजारोपणापेक्षा अधिक आहे.

याकरिता किती कालावधी लागतो ?
साधारणतः महिन्यातून ३ ते ४ वेळा दवाखान्यात जावे लागते.
ही प्रक्रिया अंदाजे १० ते १५ मिनिटात संपते.

एखाद्याने कृत्रिम बीजारोपणाचा पर्याय कधी निवडावा ?
वीर्यात शुक्रजंतूंची संख्या कमी असल्यास, शुक्रजंतूंची शक्ती कमी असल्यास किंवा वीर्यात शुक्रजंतू आजिबात नसल्यास दात्याचे शुक्रजंतू वापरून किंवा अस्पष्ट वंधत्व ही कृत्रिम गर्भधारणे साठीची काही महत्त्वाची कारणे आहेत.
आपल्याला आय यु आय म्हणजेच कृत्रिम गर्भधारणा ही प्रक्रिया निवडायची असल्यास आपल्या जवळील वंध्यत्व तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

samarthivf.com. Dr.Harshlata Laddha .