Dr.Harshlata Ladda

Consultant infertility specialist

Samarth Test Tube Baby Centre

Aurangabad

आजही आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत वंधत्व म्हणजेच महिले मध्ये दोष, आसा आव आणून पुरुष मंडळी डॉक्टर कडे जाण्याचे टाळतात . वंध्यत्वाला स्त्री जितकी जबाबदार असते तितकेच पुरुष देखील जबाबदार असतात .साधारणतः १०० वंधत्व असलेल्या जोडप्यांमध्ये ,३०% वंधत्वाला पुरुष जबाबदार असतात.
परंतु सध्या वाढत जात असलेल्या माहिती आणि तंत्रज्ञानाद्वारे ,बरीच पुरुष मंडळी स्वतः तपासनीस पुढे याने असून ,स्वतःवर उपचार देखील करून घेत आहेत . पुरुष वंधत्व हे नक्कीच जगाने लक्ष्य देण्याची गरज असलेली समस्या आहे.
पुरुष वंधत्व बद्दल थोडक्यात आणि सध्या सरळ भाषेत समजावून घेऊ .
पुरुष वंध्यत्व म्हणजे नेमके काय ?
गर्भधारणा ही काही जोडप्यानं साठी एक सरळ,साधी आणि नैसरगिक प्रक्रिया आहे , परंतु सगळ्यांसाठी ती तशीच सरळ असेल असे नाही .काहीजनांसाठी ही एक अत्यंत क्लिष्ठ, गुंतागुंतीची आणि स्वप्नवत प्रक्रिया ठरू शकते .
” पुरुष्यामधील असलेल्या विविध दोषामुळे जर महिलेला गर्भधारणेस समस्या उदभवत असल्यास त्याला पुरुष वंध्यत्व म्हणतात .”
हे केंव्हा कळते ?
जेव्हा जोडप्यांच्या सर्व तपासण्या झाल्यानंतर पुरुष्यामधे दोष आढळून येतो व महिलेच्या सर्व तपासण्या ह्या सामान्य व परिणामानुसार असतात .
सर्वसाधारण पुरुष वंध्यत्त्वाचे प्रमाण किती असते?
अंदाजे ३०% वंध्यत्वाला पुरुष जबाबदार असतात . शुक्रजंतूंची संख्या कमी आसने किंवा त्यांची शक्ती कमी आसने ह्या सारख्या समस्या आसू शकतात . असे आढळून आले आहे कि २०% लोकांना थोड्या फार प्रमाणात का होईना शुक्रजंतूच्या शक्ती किंवा संख्येशी निगडित समस्या आसू शकते . बऱ्याच शास्त्रीय तपासणीत असे आढळून आले आहे कि १०० मधून एका व्यक्तीच्या विर्या मध्ये शुक्रजंतू आजिबात नसतात .
पुरुष वंध्यत्वाची साधारण लक्षणे काय आहेत ?
१) शरीर संबांधाची इच्छा कमी आसने { जननइंद्रिया वर काम करणाऱ्या हॉर्मोन च्या कमतरते मुळे असे घडू शकते }
२)अंडकोशावर सुजन किंवाअंडकोषात सतत होणारी वेदना .
३)लिंगातील ताठरते मध्ये कमीपणा म्हणजेच शिथिलता .
४)वीर्य पतन न होणे .
५)अंडकोष लहान व शिथिल आसने .
६) अंडकोष नसणे {जन्मतः नसणे किंवा काही कारणास्तव शस्त्रक्रिया करून काढून टाकलेले असल्यास }.
७)चेहेऱ्यावर दाढी व मिशी चे प्रमाण कमी आसने किंवा आजिबात नसणे .
८) शरीरावर केसांचे प्रमाण कमी वा आजिबात नसणे .

उपचार काय आहेत ?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे आधी पुरुष वंध्यत्वाचे कारण शोधून काढल्यानंतर , स्वतः वरील उपचाराची तयारी दर्शवणे होय . वंध्यत्वाचे कारण कोणतेही असो, तुम्ही पालक बनु शकता हे स्वतःला समजून सांगणे फार गरजेचे आहे . वंध्यत्व निवारण तज्ञ , तुम्हाला ह्या बद्दल योग्य तो उपचार सुचवु शकतात . तुम्हाला ART म्हणजेच कृत्रिम गर्भधारणे मधील वेग वेगळ्या उपचाराविषयी समजाऊन सांगु शकतील. IUI , IVF, ICSI किंवा TESA-ICSI हा प्रकार देखील करता येऊ शकते .
अधिक माहिती साठी तुम्ही आमच्या वंध्यत्व निवारण तज्ञा सोबत संपर्क करू शकता .
.